प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकलंगले येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चे भूसंपादनातील बाधित शेतकरी व मिळकत धारक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे माननीय उप जिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 12 यांच्याकडे निवेदन सादर केले .
भारत सरकार यांचे राज्यपत्र सी जी डी एल 28 12 2013 25 0 93 स 52 35 चे राज्य पत्र प्रमाणे हरकती घेऊन न्याय मिळावा यासाठी राज्यपत्र प्रमाणे आमच्या हरकती नोंदवून त्याचा विचार करून आम्हाला भूसंपादनासाठी मोबदला आठ पट मिळावा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या रस्त्याचे माले, तालुका हातकलंगले येथेपर्यंत जागा मिळकतीचे चार पटीने मोबदला मिळालेला आहे परंतु अतिग्रे तालुका हातकलंगले येथील भूसंपादनात संपादित होणाऱ्या जमिनी व मिळकती व व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक अशा मिळकती आहेत तसेच या बागायती जमिनी असून त्यांचे नुकसान जास्तीत जास्त आठ पटीने मिळावे ही विनंती या निवेदन केले आहे अतिग्रे गाव हे एकमेव प्रस्तुत हायवेवर उत्तर दक्षिण या दिशेला विभागलेले असून गावचे महत्वाची कार्यालय दवाखाना, शाळा ,आरोग्य सुविधा ,अंगणवाडी, दूध डेरी ,शेती ,घरे ,लोक वस्ती ,यांची विभागणी झाली आहे यामुळे संबंधित ठिकाणी जाण्यासाठी सदरचा राष्ट्रीय महामार्ग पार करणे धोकादायक होणार आहे प्रसंगी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
सदर संबंधित विद्यार्थी ,मिळकत धारक, शेतकरी धारक ,महिला ,लहान मुले ,जनावरे यांचा रस्ता पार करण्याचा प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होणार आहे त्यामुळे अतिग्रे हद्दीत होणारा रस्ता पुलाचा असेल तर तो भरावाचा न होता तो पिलर वरून जाणारा पारदर्शक स्वरूपाचा असावा तसेच अतिग्रे येथे मिळकतीचे मूल्यांकन करताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्र म्हणून ग्रामपंचायत कडे नोंद असलेले असेसमेंट प्रमाणे सर्वे होऊन संबंधित असेसमेंट प्रमाणे असणारे मिळकत धारकांना नुकसान भरपाई मिळावी तसेच अतिग्रे येथे शाहू तलाव असल्याने त्याची दुसरी बाजू जास्त प्रमाणात जात असल्याने ते शेतकरी भूमिहीन होणार आहेत तर त्यांना दिलासा रक्कम मिळावी यासाठी माननीय उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 12 जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन देण्यात आले या निवेदनासाठी उपस्थित माननीय अॅडव्होकेट चिंतामणी कांबळे साहेब ,निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार सन्मानित माननीय विष्णू कुंभार ,निवृत्त शिक्षक माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम बिडकर, सामाजिक कार्यकर्ते आनंदा पाटील, संग्राम पाटील ,बाजीराव लोहार ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री अनिरुद्ध कांबळे, मेजर जयसिंग मुसळे ,तानाजी पाटील ,शीलवंत बिडकर ,संजय सूर्यवंशी ,अमर चौगुले ,पत्रकार संतोष कांबळे ,पत्रकार भरत शिंदे, पत्रकार शिवाजी पाटील ,अर्जुन कुंभार ,प्रफुल पाटील ,महेश कावणे, दिलीप कावणे ,सूर्यकांत कांबळे ,प्रज्योत सूर्यवंशी ,आकाराम कावणे ,व सर्व बाधित भूमिहीन शेतकरी व्यावसायिक मिळकत धारक उपस्थित होते