प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथील कुमारी शुक्रा सयाजीराव पाटील यांची सिंधुदुर्ग येथे तलाठी पदी निवड झाली कुमारी शुक्रा पाटील हिने अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे यश संपादन केले आहे तिचा तलाठी पदी निवड होईपर्यंत प्रवास म्हणजे शिक्षण इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत पद्माराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज शिरोळ येथे झाले त्यानंतर ग्रॅज्युएशन बी एस सी फिजिक्स राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे ग्रॅज्युएशन 2016 मध्ये पूर्ण केले त्यानंतर एमपीएससी सुरुवात 2017 ला सुरुवात केली व एमपीएससीच्या माध्यमातून त्यांना हे यश प्राप्त झाले व त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी पदी निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण अतिग्रे गावातून कौतुक होत आहे .
निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार अतिग्रे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड ,उपसरपंच श्री बाबासो पाटील ,सदस्य भगवान पाटील ,सदस्या कलावती गुरव ,अक्काताई शिंदे, कल्पना पाटील ,दिपाली पाटील, वर्षा बिडकर ,सदस्य अनिरुद्ध कांबळे ,नितीन पाटील ,राजेंद्र कांबळे ,ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे ,ग्राम विकास अधिकारी अशोक मुसळे ,सामाजिक कार्यकर्ते धुळोबा पाटील, सचिन पाटील ,माजी सरपंच प्रशांत गुरव ,माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील ,प्रदीप पाटील ,उत्तम पाटील, सतीश पाटील, अनिल चौगुले ,अजित पाटील ,अमर पाटील, माजी उपसरपंच प्रवीण पाटील, कृष्णा पाटील ,प्रकाश मुसळे ,राजवर्धन पाटील ,दादासो पाटील ,आदित्य पाटील, कुणाल पाटील ,हिमालय पाटील व सर्व राजश्री शाहू आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते