प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
सांगली येथे दिनांक 11 जानेवारी रोजी पत्रकारिता दिनाचे अवचित साधून मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेली पत्रकारिता उराशी बाळगून समाज प्रबोधनाचे समाज सुधारण्याचे काम अत्यंत सक्षमपणे पार पाडत असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त माननीय जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार सन्मान पार पडला .
----------------------------------------------------------------------------
प्रेस मीडिया लाईव्ह चे पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी भरत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
---------------------------------------------------------------------------
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय जयश्रीताई पाटील समाजसेविका ,माननीय रावसाहेब पाटील चेअरमन कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था ,माननीय रमाकांत घोडके मालती डेव्हलपर्स सांगली ,माननीय शिवराज काटकर राज्य उपाध्यक्ष अ भा म प परिषद, माननीय आप्पा पाटणकर ज्येष्ठ पत्रकार ,माननीय डॉक्टर रतन पाटील रोटरी क्लब सांगली सिटी प्रेसिडेंट या प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रथमता बळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली नंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत माननीय जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सर्व पत्रकारांचा सन्मान चिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला