प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकलंगले येथे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या मध्ये होणाऱ्या श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अतिग्रे नगरीमध्ये श्रीराम प्रभूंचा मंगलमय सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमांमध्ये लहान मुले महिला व पुरुष या सर्वांनी भगवे कपडे टोपी परिधान करून या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात समारंभ पार पाडला .
सर्व रामभक्त आणि अतिग्रे नागरिकांनी आपापल्या घरावर भगवा ध्वज किंवा गुढी उभा केली व घरासमोर रांगोळी काढली सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर मध्ये ह भ प श्री युवा कीर्तनकार विक्रम प्रताप बनकर कनवारकर यांचे कीर्तन संपन्न झाले .
अकरा वाजलेपासून हनुमान मंदिर मध्ये दिलेल्या अक्षता घेऊन सर्व महिला पुरुष वारकरी हे एकत्र जमले बारा वाजून 26 मिनिटांनी मुख्य कार्यक्रम अयोध्ये ज्याप्रमाणे होणार त्याचप्रमाणे हनुमान मंदिर अतिग्रे अक्षता व फुले वाहिली सर्वांना लाडू व प्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी सहा नंतर लहान मुले आणि महिलांकडून गावातून पारंपारिक वाद्य व प्रभात लेझीम पथकासह प्रभात फेरी काढण्यात आली त्यावेळी गावातील सर्वांनी फुलांचा वर्षाव केला व तदनंतर गीत रामायणाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना समिती अतिग्रे यांचे मोठे योगदान लाभले