संजय घोडावत विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे:तालुका हातकणंगले येथील  संजय घोडावत विद्यापीठात 75 वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण दर्शनाने साजरा करण्यात आला.ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

       कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की भारताचे संविधान माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य देते, हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर सर्वांनी एकोप्याने राहणे गरजेचे आहे.

  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर वाळींबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,की विद्यार्थ्यांनी नेहमी नाविन्याचा ध्यास घ्यायला हवा. स्वयंशिस्तीसाठी विद्यार्थ्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा प्रयत्न करावा. केवळ सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करता येते असे नाही तर एक उत्तम नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये पार पाडली तर ती देशसेवाच ठरते.

     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, की घोडावत विद्यापीठ विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर राहण्यास सर्वतोपरी मदत करत असते.सर्वांनी सकारात्मक वृत्ती अंगीकारल्यास यश नक्कीच मिळते.

    यावेळी घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.इंटरनॅशनल स्कूल व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.याप्रसंगी स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती,आयआयटी व मेडिकल अकॅडमी चे संचालक वासू सर,सर्व विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक उपस्थित होते. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

विश्वस्त विनायक भोसले यांनी ब्रिगेडियर अभिजीत वाळींबे यांचे प्रजासत्ताक दिनी स्वागत केले

  

Post a Comment

Previous Post Next Post