प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे - तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणारा विद्यार्थी सुदर्शन लड्डा याची 17 वर्षाखालील शालेय महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.
बिहार पटना येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील 67 व्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून सुदर्शन लड्डा मध्यम फळीतील फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे येथून सुदर्शनची निवड झालेले पत्र शाळेमध्ये नुकतेच प्राप्त झाले. त्याचे संस्थापक श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी अभिनंदन व कौतुक केले. त्याला क्रिकेट प्रशिक्षक संदीप बिरंजे, व क्रीडाप्रमुख श्री विठ्ठल केंचनावर यांचे मार्गदर्शन लाभले.