अतिग्रे गावासाठी पिण्याचे पाणी प्रश्न अत्यंत गंभीर

 या  प्रसंगी लोकनियुक्त सरपंच यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष पाटील यांना घेराव


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी  : भरत शिंदे

 अतिग्रे तालुका हातकणंगले येथे शाहू तलावातील पाणी संपत आल्यामुळे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होत चाललेला आहे त्यासाठी अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य यांनी काल मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष पाटील साहेब यांना घेराव घातला व तलावाची पाहणी करण्यास विनंती केली व पाहणी करण्यास भाग पाडले मागील पावसाळा हंगामात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे अतिग्रे येथील ऐतिहासिक शाहू तलाव पूर्ण क्षमतेने भरला गेला नाही पर्यायाने गावचा पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत हा तलाव असल्याने ग्रामपंचायत अदिन आहे ऑगस्ट 2023 पासून पाण्याचे योग्य व नियोजन पूर्वक पाणी वितरण व्यवस्था करत आहे माहे ऑगस्ट ते डिसेंबर 2023 अखेर दोन दिवस आड पाणी फक्त तीस मिनिट कालावधीमध्ये करण्यात येत होता माहे जानेवारी 2024 मध्ये आठवड्यातून फक्त दोन वेळा 25 मिनिट कालावधीसाठी होत आहे पिण्याच्या पाण्याचे कायमची सोय होण्यासाठी तलावामध्येच 50 फूट व्यासाची व 50 फूट खोल विहीर खोदण्याचे काम गाव सभा व मासिक सभा मध्ये ठरले होते त्याप्रमाणे अंदाजपत्रक मागणी आठ महिने पूर्वी उप अभियंता व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे केलेली आहे तथापि सदर यंत्रणे कडून सदर विहीर खोदणे बांधकाम करण्याचे अद्याप अंदाजपत्रक मिळाले नाही उलट प्रश्न ग्रामपंचायत अतिग्रे ला विविध प्रकारचे प्रश्नावलीच केली जाते तसेच त्यांचे सर्व प्रकारच्या प्रश्नांची पूर्तता करून देखील अंदाजपत्रक मिळणे हा विषय अजूनही संपलेला नाही आज रोजी तलावातील संपूर्ण पाणी साठा संपत आलेला आहे सदर पाणी साठी अंदाजे 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत संपेल असा अंदाज आहे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हे वारंवार विहीर खुदाई करणे कामाचे अंदाजपत्रक मिळावे याबाबत शाखा अभियंता श्री दुधाळ साहेब उप अभियंता श्री कुलकर्णी साहेब व कार्यकारी अभियंता श्री बार टक्के साहेब यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत .

 सदर विहीर खुदाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारे शासकीय निधीची मागणी केलेली नसून ग्रामपंचायतच्या स्वतःच्या उत्पन्नातून निधीची तरतूद केलेली आहे अद्यापही शासनाकडून कोणतीही अंदाजपत्रकानुसार ऑर्डर केलेली नाही काल मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष पाटील साहेब यांनी पाहणी केली तेव्हा अधिकारी यांना सदर पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर असलेने विहीर खुदाई करणे कामाचे अंदाजपत्रक सत्वर देणे साठी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांना सूचना देण्याचे मान्य केले यावेळी अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय सुशांत वड्ड यांनी यांनी सांगितले की मागणी न मान्य झाल्यास सव्वीस तारखे नंतर आंदोलनाचा इशारा जाहीर केला

यावेळी उपस्थित उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अरुण जाधव, गटविकास अधिकारी माननीय मोकाशी मॅडम ,लोकनियुक्त सरपंच माननीय सुशांत वड्ड, ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे ,ग्रामपंचायत सदस्य  भगवान पाटील, राजेंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे, नितीन पाटील ,उत्तम पाटील ,पत्रकार भरत शिंदे, उपस्थित होते


Post a Comment

Previous Post Next Post