प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे आयोध्या मधून अतिग्रे गावासाठी अक्षता कलश देण्यात आला हातकणंगले तालुक्यासाठी शिरोली येथे अक्षता कलश देण्यात आला तेथून अतिग्रे येथील तरुण वर्गाने अतिग्रे येथे येथे त्या कलश चे मोठ्या उत्साहात आगमन केले गावातील मुख्य प्रवेशद्वार येथे कलश पालखीमध्ये ठेवून त्याचे पूजन वारकरी संप्रदाय व महिलांनी केले व वारकरी दिंडीच्या गजरात संपूर्ण गावातून अक्षता कलश मिरवणूक काढण्यात आली .
यावेळी गावातील महिलांनी पालखीला पाणी घालून फुलांचा वर्षाव करून पूजन करण्यात आले या कलश च्या स्वागतासाठी संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढण्यात आली होती अक्षता कलश हे अतिग्रे येथे असणारे जागृत देवस्थान हनुमान मंदिर येथे त्याचे पूजन करण्यात आले व तिथे ठेवण्यात आले 22 तारखेला अयोध्या मध्ये ज्या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत त्याच पद्धतीने अतिग्रे येथे मोठ्या उत्साहात व गजरात कार्यक्रम केले जाणार आहेत त्यासाठी गावातील प्रत्येक घरी तेथील आलेले अक्षता पत्रिका फोटो व अक्षता देण्यात येणार आहे अयोध्या मध्ये राम मंदिर साठी अतिग्रे गावातून 28 हजार 800 रुपये देणगी देण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी खास करून अतिग्रे येतील राम भक्त श्री शिवदास माने अजित पाटील ,प्रवीण पाटील ,अनिल चौगुले ,धुळोबा पाटील, कृष्णा पाटील व सर्व रामभक्त यांनी मोठे परिश्रम घेतले आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित लोकनियुक्त सरपंच ,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य वारकरी संप्रदाय महिला वर्ग व गावातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते या पालखी मिरवणुकीच्या वेळी गावातील सर्व लोकांना माननीय धुळोबा पाटील व श्री अशोक मुसळे साहेब यांनी साखर व पेढे वाटले