प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिका स्तरावर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रतिक्षाधिन उमेदवारांना महापालिकेच्या मंजूर आकृतीबंधातील रिक्त पदांवर पात्रता तपासून अनुकंपा तत्वावरील पदावर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याबाबत पडताळणी सुरू आहे,
त्यानंतर मा, आयुक्त महोदयांची मान्यता मिळाल्यावर नियुक्ती पत्रे निर्गमित होतील, तथापि सदर अनुकंपा तत्वावर प्रतिक्षाधिन यादीवर असलेल्या उमेदवारांकडून काही त्रयस्थ व्यक्ती विशिष्ट रक्कम मागणी करत असल्याचे समजते, संबंधित उमेदवारांचे आर्थिक शोषण होऊ नये, त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये व गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रतिक्षाधिन उमेदवारांना, सावधगिरीचा इशारा देण्यात येतो की अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया ही पूर्णतः शासन नियमानुसार पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून नियमानुसार पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते, त्यासाठी कोणत्या ही अमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये, कोणासही कसलीही रक्कम देऊ नये, कोणत्याही व्यक्तीने यासंदर्भात रक्कमेची मागणी केल्यास त्यांनी रीतसर पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करणेत येत आहे.