बियाँड माउंटेन्सतर्फे आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे प्रतिनिधी :
पुणे : बियॉंड माउंटेन्सच्या टीमने ऑटिझम व डाउन सिंड्रोम मुलांसाठी म्हातोबा टेकडीवर साहसी ट्रेकचे आयोजन केले होते. विशेष मुलांसाठीच्या हा ट्रेक एक वेगळी कथा ठरली.
बियाँड माउंटेन्सची टीम वेळोवेळी साहसी उपक्रमांचे आयोजन करत असते. ऑटिझम व डाउन सिंड्रोम मुलांसाठी म्हातोबा टेकडीवर चढाईचा एक ट्रेक आयोजित करण्यात आला होता. सूर्योदयास ट्रेकची सुरेख सुरुवात झाली. विशेष मुलांनी अगदी उत्साहाने म्हातोबा टेकडी चढायला सुरुवात केली. त्यांचे प्रत्येक पाऊल स्वावलंबनाची कहाणी सांगत होते. टीमच्या सहकाऱ्यांनी विशेष मुलांना टेकडी चढण्यासाठी मदत केली. विशेष मुलांच्या उत्साहाने बियाँड माउंटेन्स टीमला अधिक बळ मिळाले.
म्हातोबा टेकडीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर म्हातोबा मंदिरात दाखल झाल्यानंतर विशेष मुलांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव अवर्णनीय होते. या ठिकाणी विविध खेळ आयोजित करण्यात आले. त्यात सहभाग घेऊन विशेष मुलांनी ट्रेकचा व स्पर्धेचा आनंद घेतला. त्यानंतर विशेष मुलांना नाश्ता व चहा देण्यात आला. सकाळची थंडी गायब झाली होती.
म्हातोबा टेकडीच्या निसर्गरम्य वातावरणात विशेष मुलांनी सैर करुन झाडे, फुले, पक्षी या सगळ्यांची उत्सुकतेने निरीक्षण केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची लहर आणि त्यांचे सहजसुंदर स्वभाव हे सर्व काही टीमच्या हृदयाला भिडले. हा दिवस बियाँड माउंटेन्ससाठी एक नवी उंची गाठणारा ठरला, असे ग्रुप लीडर समीर दिवेकर यांनी सांगितले.
Club youngistan या संस्थेसाठी हा ट्रेक आयोजिला होताऐकून पाच मुले व तीन मुली यांनी सहभाग नोंदविला तर beyond mountains तर्फे अपर्णा दिवेकर,समीर दिवेकर,ओंकार उपाध्ये,वरद हर्षे,मुक्ता कुलकर्णी,श्रीशैल्य अत्रे,श्वेता जोशी ह्यांनी परिश्रम घेतले