सिडकोच्या दोन्ही आमदारांचा जाहीर निषेध..



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

नैना विरोधी तुरमाले येथे चालू असलेल्या आमरण उपोषणाला ढोंग, तमाशा बोलणाऱ्या आणि खाऊन पिऊन उपोषण चालू आहे अशी टिंगल उडवणाऱ्या  *सिडकोच्या दोन्ही आमदारांचा जाहीर निषेध. 

अरे सिडकोच्या आमदारानो* आमच्या 6 उपोषणकर्त्यांचं गेली 6 दिवस आमरण उपोषण चालू आहे आणि तुम्ही त्याची टिंगल उडवता...जनाची नाही तर मनाची तरी ठेवा जरा....

पण तुमचं असे बोलणे पण बरोबरच आहे...कारण तुम्ही *जनतेचे आमदार नाहीतच तुम्ही सिडकोचे आमदा आहेत.. हे तुम्ही सिद्ध केलात... तुम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांशी काही घेणंदेणं नाही....

आम्हाला माहित आहे या भागातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं *कॉन्ट्रॅक्ट तुम्ही सिडको कडून घेतलं आहे*. म्हणून तुम्हाला सिडको नैना पाहिजे. पण तुमचे हे स्वप्न आम्ही कदापि सत्यात उतरू देणार नाही.....अरे  सिडकोच्या आमदारानो* इथे रोज डॉकटर येऊन चेक करतात जरा त्यांना विचारा आणि मग बोला.

 या निमित्तानेआमचं या *सिडकोच्या दोन्ही आमदारांना  एकच आव्हान आहे* कि, सरकार तुमचं आहे ना मग तुम्ही तुमचे कोणते पण सरकारी डॉक्टर घेऊन या आणि रिपोर्ट करा...आमच्या  6 जणांच्या पोटात अन्नाचा कण जरी आढळलं ना तर तुम्ही बोलाल ते आम्हाला मान्य आहे....

आमदार सांगतात का नयनाच्या ज्या जाचक अटी  आहेत त्याबद्दल आपण सरकारशी बोलू अरे 2013 पासून नैना आले आहे आणि त्यांच्या अटी काय आहेत शर्ति काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या तऱ्हेने त्यावर तुम्ही सरकार बरोबर चर्चा का नाही केले .

आणि त्या अटी संदर्भात विधानसभेत आवाज का नाही उठवला नयनाच्या ज्या शेतकऱ्याला त्याच्या जोडीला लावणारे अटे आहेत त्याबद्दल आपण एक तरी अटीवर चर्चा केली  का देशोधडीला लावणाऱ्या अटींवर एकदा तरी चर्चा केली का


बोला कधी येताय.....???

Post a Comment

Previous Post Next Post