प्रेस मीडिया लाईव्हच्या बातमीची घेतली दखल

 ग्रामपंचायतीने नाही, तर सरदार आवळे फाउंडेशनने केले सपाटीकरण


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 हेरले प्रतिनिधी / संदीप कोले 

 हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील   प्राथमिक केंद्र शाळा लगत मातंग समाजाच्या मालकीची जागा असून त्या जागेमध्ये पडीक खण आहे, त्या खणीमध्ये  ग्रामपंचायतीने  मातंग समाजाची परवानगी न घेता गावातील घनकचरा या खणीमध्ये टाकण्यास सुरुवात केली होती.  आणि तो कचरा पेटवला जात होता. त्यामुळे आसपास नागरिकांना हेरले हायस्कूल  व प्राथमिक शाळेतील मुला मुलींना त्रास सहन करावा लागत होता. त्यावेळी प्रेस मीडिया लाईव्हच्या माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली होती. 


त्याची दखल ग्रामपंचायतीने न करता सरदार आवळे फाउंडेशनच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. त्यावेळी उद्योगपती सरदार आवळे व मातंग समाजाच्या नागरिकांच्याकडून या ठिकाणी भव्य दिव्य अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करण्याचे नियोजन आहे असे सांगण्यात आले. त्यावेळी उद्योगपती सरदार आवळे,  ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, विद्यमान उपसरपंच बक्तियार जमादार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुकुमार लोखंडे, मजीद लोखंडे, सुरेश कदम,संजय शिंगे  वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव डेविड लोखंडे, धीरज लोखंडे,करण लोखंडे,विजय तिवडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अशपाक देसाई व मातंग समाजातील बांधव व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post