टिप्पर चालकांचा संप सुरुच , पोषणाचा तिसरा दिवस , कचरा उठाव ठप्प



प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : किमान वेतन मिळावे या मागणीसाठी कचरा उठाव करणारे सुमारे दोनशे टिप्पर चालक संपावर गेले आहेत. किमान वेतनची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु महापालिकेने अद्याप वर्क ऑर्डर काढली नाही. वर्क ऑर्डर त्वरित काढावी किंवा किमान वेतनचा फरक द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली होती. यावर तोडगा न निघाल्याने अखेर टिप्पर चालकांनी संप पुकारला.

जोपर्यंत वर्क ऑर्डर दिली जात नाही, किंवा फरक जमा करण्याच्या दृष्टीने महापालिका पाऊले उचलत नाही तोपर्यंत काम बंद व आमरण उपोषण सुरु राहणार असल्याचे आप प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

सोबतच दहा टिप्पर चालक व आप पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यामध्ये आप चे शहर संघटक सुरज सुर्वे, अजय पाटील, संकेत पाटील, दत्ता भातखंडे, सुकेश कदम, मंथन कुकडे, अमोल भाले, अविनाश सपकाळ, अमर बावडेकर, फिरोज मुल्लानी यांनी सहभाग नोंदवला. 

आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी दुर्वास कदम, शाहू सेनेचे शुभम शिरहट्टी, प्रकाश सुतार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, वसंत कोरवी, रावसाहेब पाटील, यशवंत भंडारे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, नाझील शेख, मयूर भोसले, रवींद्र ससे, मनोहर नाटकर, कृष्णात सुतार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post