पुणे आणि पिंपरी चिंचवड पाणी प्रश्नाबाबत विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात तातडीची बैठक



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या इमारतींमधील नागरिकांनी पाणी मिळत नसल्याने याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने तातडीची बैठक घेऊन समिती स्थापन करून प्रश्न सोडवण्यास सांगितले होते.विषय अनुसरून आज दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय आयुक्तांनी पाणी प्रश्नावर चालू कामांचा आढावा घेतला तसेच कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले. 

बैठकीसाठी पुणे महानगर पालिकेकडून पाणी विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप व पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.

दोन्ही शहराच्या वेगवेगळ्या भागातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या व त्यावर आयुक यांनी वेग वेगळ्या भागांना भेट देऊन सद्य परिस्थिती नुसार प्रत्येक भागासाठी योजना तयार करून लवकरात लवकर सादर करण्यास सांगितले .नोटीस मिळाल्यानंतर थोडाच कालावधी मिळाला असताना देखील अनेक नागरिक त्यांच्या प्रश्न लेखी स्वरूपात पुरव्यासहित घेऊन आले होते आणि आयुकांनी देखील सगळ्यांना पाणी समस्या मांडण्यासाठी वेळ दिला त्यासाठी नागरिकांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले व तेसेच 2 महिन्या ऐवजी दर महिन्याला आढावा बैठक घ्यावी असे अधिकाऱ्यांना सुचवले.

एकंदरीत पुणे महानगरपालिका पाणी व्यवस्थापन आणि वितरण लवकरात लवकर सुधारावे लागेल हे अधोरेखित केले. तसेच वितरण व्यवस्था ठीक होईपर्यंत टँकरनेच ना नफा ना तोटा तत्वावर पूर्ण क्षमतेने अपेक्षित एवढा पाणी पुरवठा करता येईल का याची चाचपणी करण्यास सांगितले.यावर पुणे महानगर पालिका काय भूमिका घेते हे लवकरच पाहण्यास मिळेल. यावेळ याचिका कर्ता आणि प्रसिद्ध वकील सत्त्या मुळे, पश्चिम पुणे भागातून पुष्कर कुलकर्णी, आशिष करपे, पूर्व पुणे भागातून आम आदमी पार्टी शहर उपाध्यक्ष सचिन कोतवाल, श्रीमती रेणुका, इतर अनेक नागरिक व टाइम्स ऑफ इंडिया चे पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post