प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
उत्तराखंड मध्ये 41 मजदुर 17 दिवस बोगद्यात अडकून पडले होते.त्यांना सहीसलामत बाहेर काढ़ण्यात यश आले आहे.ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या घटनेकडे दिवाळी सण आणि परवा झालेला वलर्डकप या मुळे या गंभीर घटनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.यात एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे या 17 दिवसात कुणालाही या मजदुरांना बाहेर काढ़ण्यात यश आले नाही.
देशातुन तसेच परदेशातुन अत्याधुनिक मशीनरी ,तंत्रज्ञान,स्पेशालिस्ट बोलवून आणि अनॉल्ड़ डिक्स या नावाचा जगातील सर्वात नं.1 चा रेस्कु स्पेशालिस्ट ऑस्ट्रेलियाहून बोलवूनही 25 डिसेंबर प्रर्यत या 41मजदुरांना बाहेर काढ़णे अशक्य असल्याचे सांगितले.एवढे सगळे करून ही काही उपयोग झाला नाही.शेवटी जुनं ते सोनं या म्हणी प्रमाणे देशी जुगाड कामाला आले त्याचं नाव 'रयांट मायनिंग आणि हे करणारयांना रयांट मायनर्स म्हटले जाते.यांच्यावर आपले प्रशासन विश्वास ठेवायला तयार नव्हते.
पण यांनी हमी दिल्यानंतर कामाला सुरुवात केली आणि फक्त 24 तासात 4.5मीटर म्यन्युअली फावडा ,आणि खोरयाने होल मारुन त्या अडकलेल्या मजदुरा प्रर्यत पोहचण्यास यश आले आणि ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या प्रर्यत पोचला त्याचं नाव होतं 'मोहम्मद नासीर "ज्यावेळी हे त्यांच्या प्रर्यत पोचले त्या सर्वानी गळ्यात पडून भावूक होऊन रडू लागले.हे यशस्वी टेक्निक वापरून त्यांना मदत करुन सिंहाचा वाटा उचलणारे मुन्ना कुरेशी आणि वकील खान यांचा समावेश होता.योगायोग असा की जे अडकले होते ते सर्व हिंदु होते आणि त्यांना बाहेर काढून वाचविणारे सगळे मुस्लिम होते.ज्यांनी या कामी मदत केली त्यांना सरकारने शासकीय नोकरी देऊन राष्ट्रपती पुरस्कारा बरोबर आर्थिक स्वरुपात बक्षिस द्यावे .अशी जनतेतून मागणी होत आहे.शेवटी मनुष्य जातीवर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी फक्त माणूस माणसाच्या कामी येतो,त्याचा धर्म किंवा जात नाही.