"राम मंदिर - राम मंदिर हा विषय श्रध्देचा आहे मात्र तो जिवण जगण्याचा रामबाण उपाय नाही .


प्रेस मीडिया लाईव्ह :

लोकांच्या मुलभुत गरजा ,सुविधा, उपाय ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण यांवर जो शासन प्रशासन खर्च करते त्याच्या किती पटीने देव - देवळे ,कुंभ मेळे ,हाज यात्रा यांवर उधळण करते , मुळात घटनेने कांही मार्गदर्शक तत्वे घालुन दिली आहेत की ज्यांना श्रध्दा ,भावना ,उपासना करायची त्यांनी जरुर करावी मात्र त्याचे राजकारण करता कामा नये .त्याला रस्त्यावर आणु नये .विशीष्ट दैवत या धर्म याला अवास्तव महत्व देणे म्हणजे अप्रत्यक्ष इतर धर्म गौण ठरविणे .

बहु संख्याकांनी बाहुच्या बेंडकुळ्या दाखविल्याकी अल्पसंख्यांना असुरक्षीत व भय पैदा होते .हा देश विभीन्न जाती धर्म ,पंथाचा मिलाफ असुन सर्वांप्रती भाईचारा असावा ,आहे हे संविधानाला तर अभिप्रेत आहेच तद्वत संत परंपरा ,महामानवांनीही तोच उपदेश केलेला आहे .अलिकडचे नायक मात्र मंदिर ,देवळांनाच राजकारणाच्या केंद्रभागी आणुन घटनेचा गळा घोटत आहेत .मग ते संसदेचे उद्घाटन असो वा विमानाच्या चाकाखाली लिंबु चिरडण्याचे असो .

संसदेत साधु- संताचा बडेजाव ,मंत्रपठण विधी त्यांच्या चरणी दंडवत नेमकं हे अभिप्रेत आहे का ?  खरया ,निस्पृह  त्यागी साधूसंताचा त्या त्या त्यांनी जरुर आदर करावा पण त्याला राजकीय व बाजारी स्वरुप आणणे गैर वाटत नसेल तर मग धन्य ते धुरीनी अजुन ही बऱ्याच लोकांच्यातील व राजकर्त्यांच्या डोक्यातील उच निचता वळवळत आहेच .

"मुर्मु " या  देशाचे प्रथम सर्वोच्च नागरीक पण आदिवासी तयांच्या दृष्टीकोनात मागास होय म्हणुनच त्यांना संसेदेच्या उद्घाटनाला टाळलं ,राम मंदिराच्या उद्घाटनाला तर लांबुनच राम राम असणार .

बाळा साहेब ठाकरेंचे वडिल केशव ठाकरे प्रबोधनकार यांनी अंधश्रध्दा व निकृष्ट ,कालबाह्य प्रथापरंपरावर अशांवर निर्भीडपणे कोरडे ओढलेत .अनेक पुस्तकांपैकी "देवळातील देव व देवांची देवळे "हे पुस्तक लोकांना बाहुलं .

प्रबोधन करतो तो प्रबोधनकार आणि अंधश्रध्दा पसरवतो तो दांभीक हे समीकरणच ना .राम मंदिर हा विषय देशाचा प्रमुख मुद्दा बनविला जातोय आणि त्याहून राजकीय भाकरी ,पोळ्या ,चपात्या ,रोट्या भाजल्या जाताहेत हे झाकुन नाही राहात .मंदिर सोहळ्याच्या आमंत्रनावरून डावला डावली ,सुंदोपसुंदी याचीही सर्व माध्यमावर खमंग चर्चा सुरु झालीय तो रामाचा कार्यक्रम झाला तरी निवडणूकीतील प्रचाराचा प्रमुख मूद्दा असणार ,बाकीचे मुलभुत समस्या गेल्या चुलीत . गरजवंत बसतात हात चोळीत .

देश कुठल्या दिशेने नेताहेत,आणिबाणी पेक्षा ही भयानक अशा घटना घडविल्या जातात खास .चं निलंबन असो ,महिला कुस्तीपटुंनी अवहेलना असो व 11 महिन्यात शेतकरी अंदोलनात 700 चे वर प्राण गमावलेले किसान असोत .

एकुनच हुकुम शाहीकडे वाटचाल नव्हे तर रस्ताच तयार होतो आहे .


- बजरंग लोणारी : इचलकरंजी

+91 80803 24216

Post a Comment

Previous Post Next Post