प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये आरोग्य, कृषी,आवास, आयुष्यमान भारत,पीएम गरीब कल्याण योजना, अन्न योजना, पीएम विश्वकर्मा,जनधन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दीनदयाळ अंत्योदय योजना, अादीचा समावेश आहे. तसेच आदिवासी विकासासाठी विशेष योजना यामध्ये स्कॉलरशिप योजना,वंदन योजना, उज्वल योजना,अशा विविध योजनांची माहिती वंचित घटकांना मिळावी या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा सुरु केली आहे.
सर्वप्रथम या रथ यात्रेचा शुभारंभ आमदार मा.श्री.प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.प्रसाद खोबरे,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. उत्तम कांबळे (दाद) यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला.
भारत सरकारच्या महत्वकांक्षी योजनांची माहिती तळागळातील लोकांपर्यत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देशभरआपला संकल्प विकसित भारत रथ यात्रेचे तारदाळ मध्येही उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले
यावेळी आमदार प्रकाश आवडे आपले मनोगत व्यक्त करताना केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली आदिवासी समाजाचे जनक बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनानिमित्त भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी या रथयात्रेचा शुभारंभ केला तळागाळातील लोकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी ही आपला संकल्प विकसित भारत ही योजना सुरू केल्याचे आमदार प्रकाश आवडे यांनी म्हटले. याप्रसंगी अनेक लाभार्थ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या घेतलेल्या लाभाबद्दल समाधान व्यक्त करून आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी तारदाळ गावच्या सरपंच सौ.पल्लवी पवार, उपसरपंच अकबर करडी, ताराराणी पक्षचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सीए चंद्रकांत चौगुले, नरसिंह पारिख, ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड,रिपब्लीन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे मंगल माळगे, श्रीनिवास कांबळे,बाळासाहेब वाशीकर,दत्ता मिसाळ,अतुल कांबळे सडोलीकर हातकलंगले तहसीलदार कल्पना ढवळे,डहातकणंगले गट विकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी,रणजीत पवार,सचिन पवार,नितीन खोचरे,अमित खोत,राणी शिंदे,दिपाली कोराणी,जीवन माने,भाऊसाहेब चौगुले,रंजीत माने,सूर्यकांत जाधव,अनिल कोळी, यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे पदाधिकारी, तारदळ गावचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते