एस. टी. महामंडळाने आता सर्व प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली .

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सांगली :  एस. टी. महामंडळाने  आता कॅशलेस सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. सांगली जिल्ह्यात कॅशलेससाठी नव्याने १६०० नवीन मशीन आल्या आहेत. त्याचा प्रवाशांसाठी वापरही सुरू झालेला आहे. 'यूपीआय क्यूआर कोड''द्वारे पैसे घेण्याची कार्यपद्धती सुरू झालेली आहे. 

प्रवासी त्याचा लाभ घेत आहेत. भविष्यात आरक्षणासही विविध लाभ देण्याचा महामंडळाचा विचार आहे.परिवहन महामंडळाकडून पुढील टप्प्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. सद्यःस्थितीत वाहकाद्वारे क्यूआर कोडमार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपद्धती समवेत जोडण्यात येत आहे. व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व अन्य मोबाईलद्वारे ८८००६८८००६ क्रमांकास संपर्क करावा. ई-मेल wecare@aritelbank.com येथे संपर्क करावा.

एसटी महामंडळाकडून लाँच केलेल्या नव्या अ‍ॅपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डवरूनच नाही, तर मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या गूगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे. या अ‍ॅपवर प्रवाशांना त्यांनी तिकिटे आरक्षित केलेली बस नेमकी कुठं आहे, हेही तपासता येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहत राहणं बंद होणार आहे. तसेच प्रवाशांना आपली कामं करून बसच्या वेळेत उपस्थित राहता येईल.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली

Post a Comment

Previous Post Next Post