प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : अनिल पवार
गुंधा गांव तालुक्यात, जिल्ह्यात नवे तर महाराष्ट्रात आदर्श गांव आहे.इते सर्व जाती धर्मातील बंधु भगिनीं एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदत असून आपापली जबाबदारी पार पाडत आहेत.मुळात जाती शिल्लक राहिले नाहीत, आम्ही राजकीय नेत्यांनी नी शिल्लक ठेवले आहेत. मी जाती धर्मात अडकण्या पेक्षा दिव्यांग, अनाथ बंधु भगिनींची सेवेत समाधानी आहे. असे शब्द आध्यक्रांतीवीर उस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त क्रांती गुरू लहुजी साळवे सेवा भावी संस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षयी भाषणात मा.मंत्री, विधमान आ. अध्यक्ष ( मंत्री दर्जा ) दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र बोलत होते. पुढे असे म्हणाले सावलीत काम करणार्या कर्मचारी चे वेतन भर उन्हात दगड फोडणार्या वडार पेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. *कमी कष्ट जादा वेतन, जास्त कष्ट कमी वेतन. ही आपली सिस्टीम. यात अडकण्या पेक्षा माझा दिव्यांग, अनाथ सेवाच बरं.
सदर कार्यक्रमास शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते शैलेश सरकटे यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
साहित्य संमेलनास अनेक कवींनी श्रोत्यांची मने जिंकले, प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शंकर मानवतकर, सुत्र संचालन ज्ञानदेव मानवतकर, आभार अध्यक्ष श्री संत गजानन महाराज सेवा संघ ह.भ.प.डॉ. नन्हई महाराजांनी केली.
या कार्यक्रमास श्री संत गजानन महाराज सेवा संघ राज्य सदस्य अनिल पवार ( पत्रकार ), सदस्य निंबा पाटील, जयदेव येवूल, राज्य प्रस्थाविक प्रमुख मारोतराव सुरसे, प्रमुख पाहुणे सचिव सिध्देश्वर शिक्षण संस्था भाऊसो झोरे, अध्यक्ष मा.ल.सा.क.म. संजय गायकवाड, राज्य अध्यक्ष अण्णाभाऊ साठे सोसन फोरम महाराष्ट्र साहेबराव पाटोळे, बांधकाम सभापती जि.प. बुलढाणा वामनराव झोरे, म्हाडा व्यवस्थापक ओम गाडेकर, मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती केशव फुके, जी.सचीव भाजपा गजानन मापारी,
भाजपा जिल्हा उध्यक्ष सुंदर संचिती, किसान सेना भाजपा जि.अ. विठ्ठलराव गिलवाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव सानप, मंडल अधिकारी गावंडे साहेब, ग्रामसेविका धोंगडे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर माने, सं.कृ.उ.स.लोणार शिवप्रसाद सारडा, ग्रामीण बँक व्यवस्थापक स्वप्नील तायडे, सरपंच गजानन देव्हडे, रांजणी सरपंच गजानन साठे, कार्यक्रम पारपाडणे साठी पुरूषोत्तम येऊल, अभिमन्यु वाढवे, सुरेश मानवतकर, लक्ष्मण भुजबळ, जयदत्त येऊल यांनी अथक परिश्रम घेतले. शेकडोंच्या पठीत गावंकरी बंधु भगिनीनि उपस्थित राहुन शोभा वाढवली.