रुकडी येथे केंद्रशाळा रूकडी अंतर्गत क्रीडा स्पर्धांना उत्साहवर्धक वातावरणात प्रारंभ


प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

रुकडी तालुका हातकणंगले केंद्रशाळा रुकडी अंतर्गत क्रीडा स्पर्धांना उत्साहवर्धक वातावरणात सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन रूकडी गावच्या सरपंच सन्माननीय सौ.राजश्री रूकडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.माननीय केंद्रप्रमुख  श्री.शशिकांत पाटील सर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.


क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना तसेच शिक्षकांना केंद्र शाळा रुकडीच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली परीट मॅडम यांनी शपथ दिली. केंद्रप्रमुख श्री.पाटील सर यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाचे महत्व व नियम  सांगितले. यावेळी रुकडी ग्रा.पं.सदस्या आणि शिक्षण कमिटीच्या अध्यक्षा सन्माननीय सौ.शोभा कोळी  तसेच तसेच केंद्र शाळा रुकडीच्या  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सन्माननीय सौ.वैशाली चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

क्रीडा विभाग प्रमुख जहीर जमादार सर मुख्याध्यापक,कन्या साजणी यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते.या स्पर्धेसाठीसौ.सोनाली परीट मॅडम मुख्याध्यापिका केंद्रशाळा रूकडी,श्री.सुरेश जाधव सर मुख्याध्यापक अतिग्रे,दिलीप कांबळे सर मुख्याध्यापक रुकडी नं 2,एस.आय. पाटील,तांबोळी मॅडम,प्रदीप माने,नितीन कमते,उमेश हरोलीकर यांचे विशेष सहकार्य लाभले.रूकडी केंद्रांतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक आणि खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.

    

Post a Comment

Previous Post Next Post