खेळातून काय शिकावे ' विषयावरील व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

 ओन्ली एच आर ' च्या दशकपूर्ती निमित्त गुणवत्ता पुरस्कार प्रदान


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मनुष्यबळ विकास क्षेत्रात विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या ​' ओ एच आर फाऊंडेशन(ओन्ली एच आर)'चा दशकपूर्ती सोहळा शनिवारी सायंकाळी गोखले इन्स्टिट्यूट येथे  आयोजित करण्यात आला होता 

ज्येष्ठ क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांचे व्याख्यान या निमित्त आयोजित करण्यात आले होते.मनुष्य बळ विकास क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या डॉ. जयश्री फडणवीस, अॅड‌. आदित्य जोशी, पर्यावरणप्रेमी  कार्यकर्ते अतुल वाघ आणि स्वच्छ फाऊंडेशन यांना गुणवत्ता पुरस्कार देऊन या कार्यक्रमात गौरविण्यात आले .तसेच यावेळी एच. आर. अवॉर्ड देऊन सचिन औटे, विशाल पाटील आणि मयूरी अहिरे यांना गौरविण्यात आले. 

सूत्रसंचालन डॉ. आशूतोष मिसाळ ​,नितीन दांगल,गायत्री देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन लांडगे यांनी केले.​' ओ एच आर फाऊंडेशन​ चे विश्वस्त सुधीर फाटक,मिलिंद काळे,प्रशांत इथापे,जितेंद्र पेंडसे,शैलेंद्र देशपांडे,विपीन घाटे,अनिकेत नीलेकर,नितीन दांगल,सचिन लांडगे ​तसेच मनुष्यबळ विकास क्षेत्रातील २०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते. 

शांतपणे मानसिक आव्हान पेला :निलेश कुलकर्णी

'वर्ल्ड कपची मॅच असो कि दुसरी कोणतीही, त्यात अगदी ग्राऊंड पीच बनविण्यापासून ते योग्य खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आदी योग्य ठिकाणी निवडण्यात यशापयश अवलंबून असते, आपल्याकडे असणारी उत्तमोत्तम साधनसामग्री आणि मनुष्यबळ योग्य दिशेने कामाला निवडणे यात ५०% यश सामावलेले असते', असे मत क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

'खेळाच्या मैदानावर आणि जीवनाच्या मैदानावरही मानसिक आव्हान पेलून कोणत्याही कठीण प्रसंगी डोके शांत ठेवून, संयमाने तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता असते, असे खेळाडू आणि असे लोक यशस्वी होतात.  अशा प्रकारचे कर्णधार सौरव गांगुली, महेंद्रसिग धोनी, विराट कोहली आपल्याला लाभले', असेही मत निलेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

'प्रत्येक दिवशी जिंकण्याची भूक आणि प्रत्येक दिवशी कालची हार-जीत विसरून १००% प्रयत्न आणि क्षमता पणाला लावून खेळणारा खेळाडू, कलाकार वा कामगार हा यशस्वी होऊ शकतो', असेही स्पष्टीकरण निलेश कुलकर्णी यांनी यशापयश मिळवण्या मागील तत्वज्ञान सांगताना सांगितले.

'मनुष्यबळ विकासात दृष्टीने योग्य ठिकाणी योग्य कौशल्य असणारी व्यक्ती आणि साधनसामग्री नेमणे, यातच अर्धे यश असते' असे एका प्रश्नाला उत्तर देताना कुलकर्णी म्हणाले.

हा कार्यक्रम शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग -इचलकरंजी, इंटरलिंक इन्शुरन्स अॅण्ड रिइन्शूरन्स ब्रोकिंग लि., लिबास कंपनी, आण्णासाहेब डांगे इन्स्टिट्यूट - सांगली, पानीमलार इंजिनिअरींग कॉलेज, टलेनसेतू सर्व्हिसेस प्रा. लि. आणि लूप हेल्थ यांच्या सहकार्याने पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post