शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे प्रतिनिधी : 

पुणे, १० डिसेंबर जाणता राजा या कलाकृतीसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या ज्या कलाकृती निर्माण केल्या, त्या एवढ्या भव्य आहेत की, या कलाकृती दीर्घकाळ टिकून राहतील, असे मनोगत पं. अजय पराड यांनी व्यक्त केले.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत पं. पराड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे व्यवस्था प्रमुख गुरुनाथ शिरोडकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.


जे काही करायचे ते भव्य करायचे म्हणजे ते दिव्य होते. जे भव्य ते दिव्य असते, हा बाबासाहेबांचा विचार होता आणि त्यावर त्यांचा विश्वासही होता, असे पं. पराड यांनी सांगितले. समाजाला योग्य दिशा आणि योग्य विचार देण्याचे काम व्याख्यानमाला करतात, असे शिरोडकर म्हणाले.

समूह नाट्याचे प्रणेते संजय पुरंदरे, जाणता राजा महानाट्याचे प्रथम दिग्दर्शक दिवाकर पांडे, होनराज मावळे आणि सहकलाकारांनी यावेळी कला रसिक बाबासाहेब हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि गायन, वादन, निवेदनाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त मंदार सहस्रबुद्धे यांनी, संयोजन राजाभाऊ पानगावे, शिरीष किराड यांनी आणि सूत्रसंचालन नागेश पाटील यांनी केले.

----

फोटो ओळी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत कला रसिक बाबासाहेब हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

----

अधिक माहितीसाठी संपर्क-

श्री. राजाभाऊ पानगावे-

९८२२७३९९८४

संजय मयेकर-

९४२२०१५४९२

Post a Comment

Previous Post Next Post