हिंदू महासंघाची भूमिका
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोथरूड येथील सुतार दवाखान्याशेजारील भूखंडावरील रुग्णालयासाठीचे आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यास विरोध करत आरक्षण कायम ठेवा, अशी मागणी सुरू झाली आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून घरे आहेत. ही जागा ताब्यात न घेता आल्याने हे आरक्षण रद्द करण्याचा खटाटोप प्रशासनाने सुरू केला आहे. कोथरूड येथेल सव्हें क्रमांक ८७ (पार्ट) येथे रुगणालयाचे (एच- ९) आरक्षण आहे. या आरक्षणातील सुतार दवाखान्याचे क्षेत्र वगळून उर्वरित जागा निवासी करावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्याचे जाहीर प्रकटन दिले आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या या प्रस्तावाला हिंदू महासंघाने विरोध केला आहे. महासंघाचे आनंद दवे म्हणाले, “कोथरूड येथील सुतार दवाखान्यात सुसज्ज, अत्याधुनिक रुग्णालय करणे आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून रुग्णालयाची जागा निवासी करून कोट्यवधींचा मलिदा लाटण्याचे नियोजन प्रशासन व राजकीय पदाधिकारी करत आहेत. या बदलाला आम्ही हरकत घेतली आहे."