प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे
पुणे:- दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रेस मीडिया या समाज माध्यमाच्या वर्तमानपत्रात डॉ. तुषार निकाळजे यांचा" निवडणूक आयोगाला अभ्यासक संशोधकांची एलर्जी " हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखामध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून एका अभिनेत्याची निवड केली आहे, या संदर्भात भाष्य करण्यात आले. या लेखाची दखल निवडणूक आयोगाने घेऊन "सदर लेख निवडणूक आयोगाच्या समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे ", असे निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी डॉ. निकाळजे यांना कळविले आहे.
निवडणूक आयोगाच्या या कृतीबद्दल डॉ. निकाळजे यांनी आभार मानले. वेगवेगळ्या देशातील निवडणूक आयोग समाज माध्यमांच्या बातम्यांची गांभीर्याने दखल घेत आहे यासंदर्भात वेगवेगळ्या देशांमध्ये चर्चासत्र देखील आयोजित केलेली आहेत व आजही होत आहेत.