प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्री धनराज पांचाळ यांनी *पुणे शहराध्यक्ष मा सुदर्शन जगदाळे यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षांमध्ये आज प्रवेश केला . धनराज पांचाळ यांनी यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून शहरातील विविध सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.
आम आदमी पक्षाचे शिक्षण, मोहल्ला क्लिनिक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारखे लोकाभिमुख उपक्रम आवडल्यामुळे आपण आम आदमी पक्षात प्रवेश करत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.* तसेच दिल्लीत ज्या प्रकारे नागरिकांना सुविधा मिळतात त्या सुविधा पुणे शहरात देखील नागरिकांना मिळाल्या पाहिजे आणि त्यासाठी पुणे महानगरपालिकेत आम आदमी पक्ष सत्तेत आला पाहिजे असे मत त्यांनी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केले