प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : चोरीची वाहने खरेदी करून ती शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या एजंटला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरीच्या १५ दुचाकी वाहने त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. ही वाहने चोरणाऱ्या त्या चोरट्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. निखील सुनिल राक्षे (रा. मार्केटयार्ड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सदरची कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार राहुल वंजारी, विकास मरगळे, राहुल थोरात, जयदेव भोसले व त्यांच्या पथकाने केली.पोलिसांनी विक्री केलेल्या चोरीच्या या दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये बुलेट, यमाहा सारख्या महागड्या गाड्या देखील असल्याचे दिसून आले आहे.