प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कैंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोनही सभागृहातून बाहेर काढले व त्यांचे निलंबन केले. लोकशाहीच्या या अपमानाच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भाजप सरकाच्या विरोधात उद्या शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वा.,जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य प्रवेशद्वाराजवळ, पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अजित दरेकर उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
Tags
पुणे