ॲड .रशीद सिद्दीकी यांना मानवाधिकार पुरस्कार



प्रेस मीडिया लाईव्ह :

मोहम्मद जावेद मौला : 

पुणे : गरीबांसाठी मोफत कायदेशीर सेवा उपक्रम सुरू केल्याबद्दल शिवाजीनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील फौजदारी वकील रशीद सिद्दीकी यांना नुकताच मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्कारामध्ये संविधानाची प्रत आणि सन्मानचिन्ह असे होते. हे पुरस्कार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, न्यायाधीश आर. व्ही जटाळे, समाजकल्याण आयुक्त डॉ. इब्राहिम जहागीरदार यांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार संरक्षण जनजागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी दैनिक आज का आनंदचे संपादक श्याम अग्रवाल, झुबेर शेख अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट, पुणे व आझम कॅम्पस येथील प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post