प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
पुणे : भाजपच्या युवा नेत्यानं रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या बाबत पोलिसांना घटणस्थळावरून कोणतेही सुसाइड नोट आढळली नाही , सुनील धुमाळ (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या भाजपच्या नेत्याचे नाव आहे . आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सुनील धुमाळ हे पुण्याच्या भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मंगळवारी सकाळी हडपसर येथील साडे सतरानळी रेल्वे ट्रॅकवर त्यांनी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळही सुसाईड नोट आढळून आलेली नाही.
या बाबत रेल्वे पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केल्याने सुनील धुमाळ भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून काम करीत होते. ते भाजपमध्ये सक्रिय होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.