प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यावर वारंवार हल्ले होत असून रविवार सायंकाळी 7:15 वाजता सच्चाईमातानगर ,कात्रज पुष्पादेवी दुगड शाळे शेजारी जागडे पिठाची गिरण शेजारी आप कार्यकर्ते प्रा. ताठे व त्यांच्या कुटुंबीयांवर दहा ते बारा जणांनी जीव घेणा हल्ला केला. त्यात ते व त्यांचे दोनं बंधू हे जबर जखमी झाले होते. तरी त्यांनी जखमी अवस्थेत असताना भारती विद्यापीठ परिसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. मारणारे आरोपी हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. या अगोदर पण येथील राहिवाश्यांना धमकी तसेच मारण्याचे प्रकार घडले असून भीतीपोटी नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर हल्ल्यात त्यांना तसेच त्यांच्या मोठ्या भावाला गंभीर दुखापत झाली असून परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व नागरिकांनी आपली घरे दार बंद करून घेतली होती. तरी गुन्ह्याची फिर्याद भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन धनकवडी येथे देण्यात आली आहे व आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरी आप पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताठे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन परिसरातील नागरिकांशी चर्चा केली तसेच पक्ष्याच्या वतीने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना सदरील ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थापण टिकवण्यासाठी तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले आणि परिसरातील बंद असलेली पोलीस चौकी लवकरात लवकर चालू करावी याचे निवेदन परिसरातील जवळपास १०० नागरिक, आप पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे , प्रवक्ते मुकुंद किर्दत, निलेश वांजळे, दत्तात्रय कदम, ॲड प्रदीप माने ,ॲड.महादेव कापरे, प्रशांत कांबळे ,सूरेखाताई भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, सुनीता काळे,योगेश देशमुख, अविनाश पवार , तगदसिंहजी, विशाल डोंबळे, नौशाद अंसारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.