टीडीएफच्या अध्यक्षपदी प्रा.संतोष थोरात , माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी राज मुजावर
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. टीडीएफच्या अध्यक्षपदी प्रा.संतोष थोरात , माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य राज मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे शहर टीडीएफ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आझम कॅम्पस येथे नुकतीच पार पडली. या सभेमध्ये पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाची त्रैवार्षिक नवनिर्वाचित कार्यकारिणी घोषित करून पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी प्राचार्य शिवाजीराव कामथे ,सचिन दुर्गाडे, संतोष थोरात, विजय कचरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच भविष्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आश्वासन दिले. यावेळी देविदास बिनवडे यांचा पुणे शहर पत्रकार संघावर निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने संविधान प्रत देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे सर, प्रा. सचिन दुर्गाडे, कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे पुणे शहर टीडीएफ नवनिर्वाचित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे शहर टीडीएफ कार्यकारिणी
संतोष थोरात(अध्यक्ष पुणे शहर टीडीएफ), बाबुराव दोडके(सचिव टीडीएफ), भगवान पांडेकर(कार्याध्यक्ष) दत्ता बनकर(उपाध्यक्ष), संजय सोनवणे(उपाध्यक्ष), दत्ता हेगडकर(उपाध्यक्ष), संतराम इंदुरे(सोशल मिडिया प्रमुख)
माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणी
प्राचार्य राज मुजावर(अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ), धोंडीबा तरटे(सचिव ),अशोक धालगडे (कार्याध्यक्ष), संजय ढवळे(उपाध्यक्ष), द्वारकानाथ दहिफळे( उपाध्यक्ष ),सुनील गिरमे (उपाध्यक्ष )
महिला टीडीएफ कार्यकारिणी
हर्षा पिसाळ-(अध्यक्षा) ,डाॅ.उज्वला हातागळे (सचिव), मधुरा चौधरी(उपाध्यक्षा), कल्पना कोल्हे(उपाध्यक्षा महिला माध्यमिक शिक्षिका संघ) भारती राऊत(अध्यक्षा), डाॅ.मंगल शिंदे(सचिव), रेखा खेडेकर(सहसचिव ) विनाअनुदानित सेल कार्यकारिणी* संजय कांबळे -अध्यक्ष बाळासाहेब ईमडे -कार्याध्यक्ष
फोटो ओळ - डावीकडून प्रा.संतोष थोरात , उजवीकडे प्राचार्य राज मुजावर
.