प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी (दि २९) या संदर्भात बैठक घेतली होती. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती. यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते.
दरम्यान, त्यांना महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार या बाबत संभ्रम होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. मुंबईचे महासंचालक रजनीश शेठ हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.