राजेंद्र तरस यांची मुस्लिम दफन भूमी साठी महानगरपालिकेला मागणी

किवळे प्रभागांमध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम समुदाय परंतु मूलभूत अधिकार दफन भूमी नाही ; राजेंद्र तरस

 प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख

पिंपरी चिंचवड शहर किवळे प्रभागात एम बी कॅम्प, विकास नगर, बापदेव नगर,आदर्श नगर, मामुर्डी, साईनगर,हे सर्व वस्त्या किवळे प्रभागांमध्ये आहे, आणि त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समुदाय वास्तव्यास आहे परंतु किवळे  महानगरपालिकेत प्रविष्ट झाल्यापासून आजपर्यंत त्यांना मुस्लिम दफन भूमी साठी जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मिळालेली नाही.

त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना राजेंद्र बाळासाहेब तरस ( जिल्हाप्रमुख - युवासेना मावळ लोकसभा पिंपरी-चिंचवड मावळ)यांनी निवेदनाद्वारे मुस्लिम दफन भूमीची मागणी केली आहे

 निवेदनात म्हटले आहे किवळे विभागातील मामुर्डी, साईनगर, विकास नगर, बापदेव नगर, आदर्श नगर, एम बी कॅम्प, किवळे या भागात मुस्लिम समुदायाची मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे परंतु नागरिक मूलभूत अधरापैकी मुख्य अधिकार दफन भूमी साठी मामुर्डी, साईनगर,किवळे प्रभागात अद्याप जागा मिळालेली नाही.

वरील नमूद केलेल्या भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये प्रविष्ट झाल्यापासुन आज पर्यंत विविध संघटनांकडून मुस्लीम दफन भूमी साठी जागा मिळावी या साठी वेळोवेळी आंदोलने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

महापालिकेतील अधिकारी याना वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती, परंतु अदयाप कोणताही प्रतिसाद मिळताना दिसत नाही म्हणून वरील नमूद केलेल्या भागात विभागातील सर्व मुस्लिम समाज व राजेन्द्र बाळासाहेब तरस यांच्या कडून  मा आयुक्त साहेब याना  विनंती केली जात आहे कि  दफन भूमी आणि ईदगाह साठी वरील नमूद केलेल्या भागात जागा मिळावी.

त्यावेळी अन्वरअली शेख विश्वस्त मक्का मस्जिद, मुशीर खान पठाण विश्वस्त अक्सा मस्जिद,मोहम्मद शेख मदिना मस्जिद, मो.अली विश्वस्थ कुबा मस्जिद, अ.रज्जाक शेख अध्यक्ष जमीयेत ऊलमा देहूरोड,शरीफ खान, मजहर खान, असलम शेख, बरकत सय्यद, सुभान शेख,उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post