सुप्रसिद्ध वृत्त वाहीनी पुणे खबर या वृत्त वाहीनीच्या वतीने पुरस्कार जाहीर.
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड :- समाजा मध्ये आज प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी जगत असतात समाजाने किती ही उपकार केले असेल तरी आपण समाजासाठी का झटावे असे अनेक व्यक्ती असतात पण काही व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी न जगता समाजाचे काही देणे असते हे भावना मनात ठेवून निस्वार्थ पणे समाजासाठी नेहमी झटत असतात असेच भावना मनात ठेवून गोर गरीबांना न्याय देणारे समाजिक नेते व ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांना पुणे खबर वृत्त वाहिनीच्या वतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे खबरचे संपादक रजाक शेख यांनी हा पुरस्कार जाहीर केल्याचे प्रेस मीडिया लाईव्ह वृत्त वाहीनीचे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख यांना माहीत देताना दिली.
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे अध्यक्ष एम डी चौधरी यांनी अनेक वेगवेगळ्या विषय वर अनेक खटले त्यांनी मानव आयोगात दाखल करून पीडित गोर गरीबांना न्याय मिळवून दिले आहे तसेच सांगली पुरग्रस्तांना कोटी रुपये आयोगाच्या मार्फत मिळवून न्याय दिले तर एका शाळेकरी मुलाला शिक्षकांनी दबाव निर्माण केल्याने मुलाने आत्महत्या केली तर त्यामुलाचे आईला आयोगाच्या मार्फत न्याय मिळवून दिले, भोसरी येथील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) चा स्फोट होऊन लहान बाळासह परिवार मृत्युमुखी पडले होते या बाबत ची दखल घेत चौधरी यांनी आयोगात तक्रार दाखल केले आयोगाने वीज वितरण च्या अधिकार्यांना १० लाख रूपये चे दंड ठोठावला व एका पोलीस अधिकार्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई केल्याने त्या अधिकार्याचे तीन वर्षासाठी बढती थांबविले असे अनेक चांगले सामाजिक कार्याबद्दल एम डी चौधरी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे व पुणे खबर संपादक यांच्या हस्ते हा पुरस्कार आकुर्डी येथील मदर वर्ल्ड जय गणेश व्हिजन येथे एम डी चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्यात
प्रमुख अतिथी म्हणून द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष k9 वृत्त वाहीनी चे महाराष्ट्र मुख्य संपादक रामदास ताटे व दैनिक जयहिंद महाराष्ट्र चे संपादक नौशाद उर्फ नाना शेख ,सहसंपादक श्रीनिवास माने, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, द जस्ट आज वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे, धम्मसदन चे मुख्य विश्वस्त के. एच. सुर्यवंशी, धम्मनेते प्रकाश कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमनी, राष्ट्रवादी कामगार सेलचे
कामगार नेते दिपक चौगुले, ईपीएस देहूरोड शहर अध्यक्ष हिरामण साळुंके, बाबू हिरमेठकर मानव आधार सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, प्रेस मीडिया लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी, ऑल इंडिया उलमा बोर्ड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अन्वरअली शेख
सामाजिक कार्यकर्ते राजाराम अस्वरे,(दादा) सुप्रसिद्ध भीम गायक प्रभाकर निकम, असे अनेक दिग्गज मान्यवर या सन्मान सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.