प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
पिंपरी : स्पा सेंटर च्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे धक्का दायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथे पोलिसांनी कारवाई करून या स्पा सेंटरचा पर्दाफाश करून त्यांनी दोन पीडितांची सुखरूप सुटका केली.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. 23) ही कारवाई केली. तर स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी आकुर्डी येथील गणेश व्हिजन मॉल येथील ब्लू स्टोन्स स्पा येथे ही कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी राकेश शिंदे,अक्षय बनकर व एक महिला आरोपी अशा तिघांना अटक केली आहे .