प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड पेठ वडगाव येथे बीएड द्वितीय वर्षातील सेमिस्टर तीन मधील शालेय आंतरवासिता प्रात्यक्षिका अंतर्गत गट क्रमांक तीन "जे.के.माळवे माध्यमिक विद्यालय पेठ वडगांव"येथे दोन महिन्याची आंतरवासिता संपन्न झाली. ही आंतरसिता दिनांक ३/१०/२०२३ पासून सुरू करण्यात आली होती.
या आंतरवासते दरम्यान छात्राध्यापकांनी अध्ययनाबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवले यामध्ये रांगोळी स्पर्धा ,पारंपारिक वेशभूषा स्पर्धा ,वृक्षारोपण, जागतिक शिक्षक दिन ,स्वच्छता मोहीम ,कवायत प्रकार, टपाल दिन ,आरोग्य तपासणी ,वाचन प्रेरणा दिन, चित्रकला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू ,क्रीडा स्पर्धा यासारखे उपक्रम राबवले. सोमवार दिनांक 11/ 12 /2013 रोजी अंतरवासितेचा सांगता समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सौ. निर्मळे आर. एल प्र. प्राचार्या कॉलेज ऑफ एज्युकेशन, बीएड पेठवडगाव तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. के.माळवे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .जे.बी.पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शिका सहा.प्रा. शिरतोडे व्ही.एल. ,शाळेतील माजी विद्यार्थी श्री राम चरे हे चिकुर्डे हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते. इतर उपस्थितीमध्ये विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, अंतर्वासिता गटातील छात्र अध्यापक, छात्र अध्यापिका, विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थितीत होते .या गटाची शालेय आंतरवासिता हे प्रात्यक्षिक प्राचार्या निर्मळे आर. एल.व प्राध्यापिका शिरतोडे व्ही.एल. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छत्राध्यापक रोहन फराक्टे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका कोमल नंदे यांनी केले. आंतरवासिता दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ निर्मळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्या गुणांना वाव द्या व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन कशाप्रकारे व कोणत्या स्वरूपात करावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. मोबाईलचे महत्व त्याचे फायदे तोटे मुलांना सांगितले तसेच अध्यक्षांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी छात्र अध्यापकांना भविष्याविषयी मार्गदर्शक करून भविष्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक ज्ञान याविषयी माहिती सांगितली. नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. तसेच छात्राध्यापिका तेजस्विनी नादवडे व छात्राध्यापक संग्राम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजकतेने मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेसाठी छात्र अध्यापकांनी उपयोगी वस्तू भेट देऊन आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
अशा प्रकारे ही दोन महिन्याची अंतरवासिता टप्पा क्रमांक दोन अगदी व्यवस्थित रित्या पार पडली.