प्रेस मीडिया लाईव्ह :
पेठ वडगाव : वाळवा तालुकाच्या भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी प्रविण माने याने दै.द.वाळवा क्रांतीचे संपादक गजानन शेळके यांना फोनवरून अरेराववीची भाषा वापरून धमकी दिल्याबद्दल युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की लोकशाहीचा महत्त्वाचा असणारा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता..! जांभेकर, टिळक, आगरकर ,अत्रे इत्यादी मंडळींनी या माध्यमाचा उपयोग लोक जागृतीसाठी केला. लोकांसमोर खरी व न्यायाची बाजू मांडणारे दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. परंतु पत्रकारांना धमकी, हल्ला होण्याच्या घटणा अलीकडे वाढीस लागलेल्या आहेत व बर्याच ठिकाणी घडत आहेत.अशा समाजकंटकावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कडक करावी कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी केली आहे.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार तालुका अध्यक्ष मिलिंद कुशीरे,उपाध्यक्ष किशोर जासूद, कोल्हापूर सम्राट चे संपादक जय कराडे (सर) उपस्थिती होते.