खुर्चीला गालबोट लागेल असे कोणतेही काम माझ्याकडून होणार नाही - प्रतीम म्हात्रे
माझे वडील जे एम म्हात्रे यांच्यात मी देव पाहिलाय
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : एका शाळेचा विद्यार्थीची त्या शाळेच्या चेअरमनपदी निवड केली जाते यापेक्षा दुसरे भाग्य काय असणार आहे. या खुर्चीला गालबोट लागेल किंवा चुकीचे काम होईल असे कोणतेही काम माझ्या हातून होणार नाही हे शपथेवर सांगतो. कष्ट करणारा माणूस हा कधीही हारत नाही आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझे वडील जे एम म्हात्रे ! मी त्यांच्यात देव पहिला आहे असे त्यांनी चेअरमन पदाचा स्वीकार करताना सांगितले.
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी श्री.प्रितम म्हात्रे यांची निवड झाली त्यावेळी ते के.वी. कन्या महाविद्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले की ज्या शाळेचा विद्यार्थी म्हणून मी मोठा झालो त्या शाळेच्या चेअरमनपदीची जबाबदारी माझ्यावर सोपविल्यामुले मी भारावून गेलो आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पेलताना शाळेची उत्तमा उत्तम प्रगती करण्यावर माझा भर असेल.
समस्त पनवेलकरांना अपेक्षित असलेली आपली शाळा आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये एक वेगळा उच्चांक गाठेल अशा प्रकारे सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी भविष्यात काम करणार आहे. आणि या खुर्चीला गालबोट लागेल किंवा चुकीचे काम माझ्या कडून होणार नाही असे मी आत्मविश्वासाने सांगतो.
यावेळी मा. आमदार बाळाराम पाटील यांनी प्रस्तावना करताना सांगितले के वी कन्या शाळेचा शिक्षणाचा दर्जा एवढा उत्तम आहे. की येथे एका पेक्षा एक शाळा आल्या पण या शाळेला कधीही ग्रहण लागले नाही. उलट प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहचत आम्हाला प्रत्येक वर्षी प्रवेश बंदचे फलक लावावे लागले. या शाळेने उत्तम उत्तम प्रगती करत उच्च दर्जाचे विद्यार्थी घडविले आहेत. ज्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. या अगोदर श्री. प्रितम म्हात्रे यांनी शाळेच्या माध्यमिक विभागाचे शाळा समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ते अध्यक्ष असलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या ग्रामीण भागात स्वतःच्या शाळा सुद्धा आहेत. ज्यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरूपात शिक्षण सेवा दिली जाते. त्यांनी आजपर्यंत कोकण एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती सदस्य म्हणून केलेले काम आणि त्यांचा शिक्षण क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव पाहता
या विद्यालयाच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची नियुक्त करण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्या हातून शाळेची उत्तम उत्तम प्रगती होईल अशी आशा व्यक्त करतो.
यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती नारायण घरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेकपाचे विधानसभा संघटक काशिनाथ पाटील, सौ ममता म्हात्रे, मा. नगरसेविका प्रिती जॉर्ज, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, विश्वास म्हात्रे, माधुरी गोसावी ( मम्मी ) यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद विद्यार्थी व कुटुंब व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता