प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-पोलिस मुख्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय 54 .सातारा ).यांचा शनिवारी दुपारी कर्तव्य बजावत असतानाच त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला.ते पोलिस मुख्यालयात वाचक म्हणून कार्यरत होते.त्या वेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने काही वेळातच ते कार्यालयातच खाली कोसळले असता बेशुध्दावस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
पोलिस उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ वाचक म्हणून कार्यरत होते.राज्यपाल रमेश बैस आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचा कोल्हापुर दौरा असल्याने त्यांच्या बंदोबस्ताची तयारी चालू होती.या धांदलीत भुजबळ यांच्या छातीत दुखू लागले.त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने सहकारयांना सांगत असतानाच खाली कोसळले त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्यात आला.