प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
सध्या हा प्रकल्प मुंबईतील गोवंडी येथे कार्यान्वित आहे. तेथे आठ ते दहा किलोमीटर परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी, वायु प्रदूषण, उग्र दर्प यामुळे सातत्याने घुसमट होत असते. त्याचबरोबर कॅन्सर, श्वसनाचे आजार यासारख्या जीव घेण्या आजारांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे. या प्रकल्पा विरोधात तेथील रहिवाशांनी एकत्र येऊन सामाजिक संस्था स्थापन केली. व त्या संस्थेमार्फत या प्रकल्पा विरोधात हायकोर्टात प्रखर लढा दिला त्यानुसार हायकोर्टाने हा प्रकल्प दोन वर्षात अन्यत्र स्थलांतरित करण्याचे सक्तआदेश दिले आहेत .
जैव वैद्यकीय कचरा म्हणजे मुंबई व परिसरातील सर्व लहान मोठे 11 हजार रुग्णालयातील मधुमेह रुग्ण, कॅन्सर रुग्ण,इ. यांचे शरीराचे निकामीअवयव काढल्यानंतर त्याची विल्हेवाट या प्रकल्पाद्वारे लावली जाते. तसेच रुग्णालयातील बँडेज, इंजेक्शन सिरीन इ. कचरा सुद्धा या प्रकल्पात जाळला जातो. आणि अशा घातक प्रकल्पाला
महाराष्ट्र शासनाने पाताळगंगा एमआयडीसी येथील भूखंड मंजूर केला आहे. म्हणजे भविष्यात आपल्या व आपल्या येणाऱ्या पिढीला हा जीवघेणा त्रास सहन करावा लागणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे आपल्या परिसरात भविष्यात येणारे रहिवासी, औद्योगिक, शैक्षणिक व तस्म प्रकल्प येणार नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनींना भाव मिळणार नाही, त्याच प्रमाणे भविष्यात तरुण पिढीला येथे नोकऱ्या व रोजगार उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे पाताळांगा नदीचे पाणी दूषित होण्याचाही धोका संभवतो. अशा एक ना अनेक समस्या या प्रकरणामुळे भविष्यात निर्माण होणार आहेत, तरी सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संस्था, परिसरातील ग्रामपंचायती, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट, वारकरी संप्रदाय इ. सर्वांनी एकत्र येऊन प्रखर लढा देण्याची वेळ आली आहे.
या प्रकल्प विरोधातील पहिली सर्व पक्षीय बैठक प्रिया कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत प्रिया असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुनील कदम, मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी, वडगाव ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे व राजेश पाटील, माझगाव ग्रामपंचायतचे सदस्य राजेश पाटील, बोरवली ग्रामस्थ मयूर पाटील व प्रवीण पाटील, प्रियाचे पदाधिकारी डी एस गुरव, अंशुमन दुर्गाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.