प्रेस मीडिया लाईव्ह :
सीआयडी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस यांचे आज मंगळवारी (5 डिसेंबर रोजी वयाच्या 57 वर्षी निधन झाले. यकृत निकामी झाल्याने ते मागील काही दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात भरती होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. CID या मालिकेत फ्रेडरिक्सची भूमिका साकारून दिनेश फडणीस घराघरात जाऊन पोहचले होते
अभिनेता दिनेश फडणीस हे सीआयडी या मालिकेतील भूमिकेमुळे लोकप्रिय झाले होते त्यांनी छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत त्यांच्या करिअरला घेऊन गेले. त्यांनी सीआयडीसोबतच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्येही अभिनय केला असून, यामधील विनोदी भूमिकेने त्यांनी चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. दिनेश फडणीस यांनी टीव्ही शो बरोबरच बॉलिवुडमधील आमिर खानच्या 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर 30'मध्येही अभिनय केलेला आहे. त्यांच्या या निधनामुळे छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अभिनेता दिनेश फडणीस यांच्यावर बोरीवलीतील दौलतनगरमधील स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या सहकलाकार अभिनेते पोहोचलेले असून, ते त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकतात.