प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
मिरज - सां.मि.कु.महानगरपालिकेचे मा.महापौर आणि आरपीआय (आठवले) पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विवेकरावजी कांबळे साहेब यांचे निधन झाले.काही दिवसापूर्वी सकाळी मॉर्निग वॉकला जाताना त्यांना दुचाकी मोटारसायकल स्वाराने धडक दिली होती.त्यात ते जखमी झाले होते.त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालू होते त्यातच त्यांचे दुख:द निधन झाले.ते आंबेडकरी चळवळीतील एक आक्रमक व्यक्ती म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.
आपली स्वतःची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून ही समाजातील गोर गरीब लोकांच्यावर खेडे गावात त्यांच्यावर होत असलेला अन्याय साहेबांना स्वस्थ बसू देत नव्हते.म्हणुन त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपले फक्त दहावी प्रर्यतच शिक्षण अर्धवट सोडून आपला स्वाभिमान जागा करून त्यांनी आपल्यासह राजा ढ़ाले,केंद्रींय मंत्री रामदास आठवले,ज.वि.पवार आणि नामदेव ढ़साळ या सर्वानी मिळून अनेक कार्यकर्त्यांना एकत्र करून दलित प्य्ंथर या संघटनेची स्थापना केली होती.या संघटनेचा प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला.त्या मुळे समाजाला एक प्रकारे बळच मिळाले.
प्रस्थापित व्यवस्थेचा अन्याय अत्याचाराला विरोधात त्यानी आयुष्यभर संघर्ष करून स्वतः राजकारणासह समाजकार्यातही सक्रीय होऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली..त्यामुळे जिद्दी आणि अभ्यासू असलेल्या विवेक कांबळे यांनी सात वेळा सां. मि. कु .महापालेकीची निवडणुकीत विजय मिळवून नगरसेवक ते गटनेते प्रर्यत मजल मारली आणि सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर झाले.त्यांनी आपल्या बरोबच युवकांनाही काम करण्याची संधी देऊन विवीध क्षेत्रात कामकाज करणारी युवा पिढ़ी घडविली.जिल्हयासह पश्चीम महाराष्ट्रात विवेक कांबळे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला होता.ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती.विवेक कांबळे साहेबांचा अपघात झाला होता.त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते पण उपचार सुरु असतानाच त्याचे निधन झाले.