प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एस.जगताप यांनी एकतर्फी प्रेमातुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी देऊ बाबू बोडके याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.या केस मध्ये सरकारी वकील म्हणून Ad.मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
अधिक माहिती अशी की,बोंद्रेनगर परिसरातील महिला धुण्या -भाड्यांची कामे करत होती.यातील युवती ही आपली बहीण आणि आजी सोबत राहून बाहेरील घरगुती कामे करत होती.तेथीलच देऊ बोडके हा आपल्या सहकारी मित्रासोबत टवाळकी करून त्या युवतीवर एकतर्फी प्रेम करुन माझ्याशी लग्न कर म्हणून वारंवार त्रास देत होता.या त्रासाला कंटाळुन सदर युवतीने 19/6/16 रोजी रहात्या घरात आत्महत्या केली होती.या प्रकरणी देऊ बोडके याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांनी करून कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्यात साक्षीदारांच्या साक्ष आणि सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एस.जगताप यांनी आरोपी देऊ बोडके याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे .