आंबट शौकीनांवर शाहुपुरी पोलिसांची कारवाई.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- व्हिनस कॉर्नर परिसरात आज शाहुपुरी पोलिसांनी या परिसरात थांबलेल्या वारांगणाशी हुज्जत घालून गोंधळ घालण्यारयां 15 ते 20 तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक करून नंतर सोडुन देण्यात आले.

या वेळी तेथे थांबलेल्या वारांगणांनाही हटकण्यात आले.ही कारवाई त्या परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वरुन शाहुपुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एम.कोल्हाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.शहरात ज्या -ज्या ठिकाणी वारांगना थांबतात त्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असतात.तेव्हा प्रत्येक हद्दीतील पोलिसांनी कारवाई करून अशाना आळा घालावा अशी नागरिकांतुन मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post