प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- बागलचौक परिसरात असलेल्या मसाज पार्लरवर अनैतिक मानवी वहातुक पथकाच्या पोलिसांनी छापा टाकून चालक नागेश रमेश बेळेन्नावर (वय 31 रा.पु.शिरोली ) याला अटक करून 5 पीडीत महिलांची सुटका करून त्याच्याकडील रोख रक्कम 31हजार 560 रुपये,मोबाईल आणि निरोध पाकिटे जप्त केली आहेत.
अधिक माहिती अशी की,बागलचौक परिसरात मसाज च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती अनैतिक मानवी वहातुक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गिताजली बाबर यांना मिळाली अ सता त्यांनी पथके तयार करून त्या ठिकाणी बोगस कस्टमर पाठवून खात्री करून संशयीत नागेश याला अटक करून 5 पीडीत महिलांची सुटका करून त्यांना तेजस्विनी वस्तिगृहात ठेवले आहे.आणि या व्यवसायासाठी जागा दिल्यामुळे जागा मालक अब्दुल रशीद बागवान (रा.युनिक पार्क ,कदमवाडी) याच्यावरही पोलिसांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी नागेशकडे चौकशी केली असता पीडीत महिलाचा असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्या कामासाठी 4000 रुपये देत असल्याचे सांगून आपण हा व्यवसाय करत असल्याचे कबुल केले.त्याच प्रमाणे पिडीत महिलांनीही आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून आम्ही गरजेपोटी हा व्यवसाय करत असल्याचे सांगून आम्हाला या कामासाठी 800 रुपये मिळत असल्याचे सांगितले.आरोपी नागेश बेळेन्नावर याच्या विरोधात शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,अनैतिक मानवी वाहतुक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गितांजली बाबर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.