प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्याचा मुलगा ऋतुराज यांनी वरपे कुंटुबियांना मारहाण केलेला व्हिडीओ सगळी कडे व्हायरल झाला होता.त्या टेरेस वर वारंवार चालणारयां पार्टी तुन होणारा दंगा यामुळे दंगा करू नका आम्हाला त्रास होतोय असे राजेंद्र वरपे सांगताच क्षीरसागर पिता पुत्रानी मारहाण करून हा फ्लॅट विकुन जावा म्हणुन धमकावल्याने आमच्या कुंटुबाला क्षीरसागर परिवाराकडुन धोका असल्याचे सांगून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही टेरेस वरुन उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे सांगून या प्रकरणी क्षीरसागर परिवाराला जबाबदार धरावे .असे राजेंद्र वरपे यांच्या मुलीने व्हायरल झालेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करून घडलेल्या घटने बाबत दोषी वर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी सांगितले असून वरपे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांची भेट घेऊन परस्परांच्याविरोधात निवेदने दिली आहेत.