प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
गारगोटीचे प्रवासी बेवारसपणे कोल्हापूरच्या सेंट्रल बस स्टैंड वर उभा राहिलेले असतात. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या बस त्यांना इकडून तिकडे पळवते .नवे सीबीएस स्टॅन्ड झाल्यापासून गारगोटीचे एसटीचे जाण्याचे ठिकाण निश्चित होते पण अलीकडच्या काळामध्ये शेकडो प्रवाशांना उन्हामध्ये, पावसामध्ये उभा राहावे लागते आणि येणाऱ्या प्रत्येक मिनिटाच्या बस पासून जीव वाचून इकडे तिकडे फिरावे लागते. नाकात तोंडात धुळीचे लोट जातात. या साऱ्याची कल्पना विद्यमान आमदार प्रकाश आंबीटकर साहेब व के.पी.साहेब यांना असणे शक्य नाही .कारण ते कधीच एस.टीने प्रवास करीत नाहीत त्यांनी आपल्या आमदारकीची राजकीय ताकद वापरून गारगोटी राधानगरी कडे जाणाऱ्या त्यांच्या हजारो मतदारांच्यासाठी परिवहन मंत्रालयाकडून काहीतरी सोय निश्चित करावी त्याचप्रमाणे कर्नाटकातील निपाणी सारख्या बस स्टॅन्ड भोवती सिमेंट काँक्रीटची पक्की जमीन केली आहे त्यामुळे खडी धूळ यांचे लोट स्टॅन्ड मध्ये उडत नाहीत याउलट गारगोटीच्या एसटी स्टँडवर पावसाळ्यात डबकी आणि चिखल तर उन्हाळ्यात खडी आणि धुळीचे लोट उडत असतात याचाही बंदोबस्त करावा
आता माजी आमदार आणि दूधगंगा वेद गंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील साहेबांना विनंती आहे की त्यांनी उत्तम रीतीने चालवलेल्या महाविद्यालयाला साधारण बाराशे मुलं मुली दररोज ये जा करत असतात तेही कागल राधानगरी करवीर आणि भुदरगड या तालुक्यातून येतात मोठ्या संख्येने या येणाऱ्या मुला मुलींना मुदाळतिट्यावर बस साठी जीव घेणी स्पर्धा करावी लागते. त्यांच्या या स्पर्धेमध्ये नेहमी एसटीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा जीव जाण्याची वेळ येते विद्यमान आमदार आणि केपी साहेब या दोघांनीही या मुलांच्या सोयीसाठी गारगोटी बिद्री किंवा गारगोटी मुदाळ तिट्टाअशा स्वतंत्र एसटी बसेसची सोय शाळेच्या सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळी करावी अशी नम्र विनंती आहे
डॉ सुभाष देसाई जेष्ठ पत्रकार
गारगोटी कोल्हापूर