महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बंद अवस्थेत 32 उभ्या वाहनांना नोटीसा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर ता.19 : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावर बंद अवस्थेत (स्क्रॅप) उभी असलेल्या 32 वाहनांना महापालिकेच्यावतीने नोटीसा लावण्यात आल्या. या नोटीसांची तीन मुदत दिली असून तीन दिवसात संबंधीतांनी रस्त्यावरील बंद अवस्थेत असलेले वाहन न काढल्यास शहर वाहतूक शाखा व महापालिकेच्यावतीने ती वाहने जप्त करण्यात येणार आहेत. यामध्ये शहरातील व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक, चिमासाहेब महाराज चौक ते महानगरपालिका परिसर, प्रायव्हेट हायस्कुल ते केशवराव भोसले नाटयगृह परिसर व पांजरपोळ परिसरातील बंद असलेल्या 32 वाहनांना नोटीसा चिकटविण्यात आल्या.







शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहने बंद अवस्थेत (स्क्रॅप) एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे उभी आहेत. हि वाहने रस्ते पुल, उडडाण पुल येथे अनाधिकृतपणे रस्तेवर उभी आहेत. अशा बेवारस व वापरात नसलेली वाहने रस्त्यावर लावल्यामुळे वाहतुकीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होऊन अपघात सदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे. रस्त्यावर वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या अशा वाहनांवर महापालिका व शहर वाहतूक शाखेच्यावतीने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post