प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले
कोल्हापूर : भाई माधवरावजी बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विक्रमनगर, कोल्हापूर. मध्ये आज बुधवार दिनांक 6/12/ 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका- सौ. कोळेकर एस.ए. यांनी प्रतिमेचे पूजन केले.सौ. नाकाडे एम. एच, यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य याविषयी माहिती सांगितली. श्री.पाटील एस. जी, व श्री. कुरणे आर. ए. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली.श्री. सोनवणे पी. एल, यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.