प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- आमच्या पंधरा वर्षाच्या मुलात स्वामी समर्थ प्रकटले आहे असे म्हणुन नागरिकांची दिशाभुल करून फसवणूक करणारे सौ.इंद्रायणी हितेश वलादे (36)आणि हितेश लक्ष्मण वलादे (37 दोघे रा.कदमवाडी रोड ,क.बावडा) या पती पत्नी विरुध शाहुपुरीचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी फिर्याद दिली असून शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,वलादे पती पत्नी यांना भव्य नावाचा पंधरा वयाचा अल्पवयीन मुलगा आहे.हे मुळचे गडचिरोली भागातील असून ते सध्या राम चौगुले कॉलनी, कदमवाडी रोड ,किरण पालघर यांच्या घरी भाड्याने रहात आहेत. त्यांचा मुलगा भव्य हा आजारी आणि अल्पवयीन असल्याचे माहिती असून ही आमच्या मुलाच्या अंगात "स्वामी समर्थ प्रकटले "असून त्याच्यात स्वामीचा अवतार असून तुम्ही तुमच्या कुलदैवताची पुजा करून स्वामीच्या नावाने प्रसाद करून वाटप करा असे सांगत तुम्ही माझ्याकडे 5 गुरुवारी दर्शनाला या असे म्हणत आज दत्त जयंती असल्याने पारायणाचा कार्यक्रमही चालू होता.याची माहिती अंनिसला समजताच त्यानी ही माहिती शाहुपुरी पोलिसांना दिली .पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी करून त्या मुलाच्या आई वडीलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा तपास मपोसई प्रणाली पवार या करीत आहेत.